
शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा-प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर नेहमी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. शुक्रवारी पुन्हा त्यांचं एक विधान पुढे आलेलं आहे. यातून ते कार्यकर्त्यांना गाड्या फोडण्याचं आवाहन करत आहेत.शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा, असं थेट आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांनीही साद दिली. त्यामुळे येत्या काळात राज्यामध्ये गाड्या फोडाफोडीचं राजकारण रंगू शकतं, असं दिसतंय.आधी अमोल मिटकरी, त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्या फोडण्यात आलेल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईदेखील केलेली आहे. आता प्रकाश आंबेडकरांसारखा एखादा नेता थेट गाड्या फोडण्याचं आवाहन करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.