
गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू, हडफडेच्या रोमिओ लेनमध्ये घडली घटना
गोव्यातील हडफडे येथील नाईट क्लबमध्ये आग लागून २३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रोमिओ लेनमध्ये असलेल्या रेस्टॉरंट कम् क्लब ब्रीचमध्ये रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली.मृतांमध्ये पर्यटकांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देत घटना आणि मदत कार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करुन घटनेचा माहिती घेतली.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांचा मदत देण्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २० पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. गोवा सरकाकडून या घटनेचा सखोल तपास करुन, दोषींना तुरुंगात डांबण्याची हमी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. तसेच, यातील मृतांच्या प्रती सहवेदना व्यक्त केल्या तसेच, जखमींना आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राज्यात पहिल्यांदाच एवढी मोठी घटना घडल्याचेही त्यांनी नमूद केले




