साडेतीन वर्षापूर्वी बांधलेली गॅस शवदाहिनीची इमारत सुरू न होताच पडून

चिपळूण शहर लोकसंख्येच्या स्तरावरही झपाट्याने वाढत चालले आहे. अशावेळी येथील रामतीर्थ स्मशानभूमीतील इमारतीची अवस्था बिकट होत चालली आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकूड घर दुरावस्थेत पोहचले आहे. अशावेळी साडेतीन वर्षापासून बांधून ठेवण्यात आलेले गॅस शवदाहिनी निरूपयोगी बनण्याची का वाट पाहण्यात येत आहे, असा प्रश्‍न नागरिकांतून करण्यात येत आहे.

चिपळूण नगरपरिषदेने १४ व्या वित्त आयोग अंतर्गत रामतीर्थ स्मशानभूमी येथे गॅस शवदाहिनी बसविण्याचे काम २०२१ च्या डिसेंबर महिन्यात पूर्ण केले, यासाठी ३३ लाख ५१ हजार इतकी रक्कम खर्ची घालण्यात आली. गेली साडेतीन वर्षे या संदर्भाने या व्यवस्थेचा उपयोगच करण्यात आलेला नाही, आता गॅसची उपलब्धता न झाल्याचे कारण देखील सांगण्यात येईल. पण गॅस वा इलेक्ट्रीक अशा दुहेरी पद्धतीने याचा वापर शक्य नव्हता तर इमारत एवढ्या आधी बांधून का ठेवण्यात आली हा प्रश्‍न उरतोच.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button