तेरवण गावातील एका आंबा बागेत वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकित अडकून जखमी झालेल्या बिबटयाचा उपचार करताना मृत्यु.

राजापूर : तालुक्यातील तेरवण गावातील एका आंबा बागेत वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकित अडकून जखमी झालेल्या बिबटयाला वनविभागाने रेस्क्यु करून काढल्यानंतर उपचार करतानाच त्या बिबटयाचा मृत्यु झाला आहे.हा बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय सुमारे ४ ते ५ वर्ष असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. वनविभागाच्या वतीने या मृत बिबटयाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. शनिवारी ३ मे रोजी हा प्रकार घडला आहे.फुफुसाला झालेले इन्फेक्शन (संसर्ग) या मुळे मृत झाला असावा असा प्राथमिक अहवाल पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी केला आहे.

अशा प्रकारे फासकीत अडकून या बिबटयाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने पुन्हा एकदा अशा प्रकारे शेतात व बागांमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावल्या जाणाऱ्या फासक्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. अशा प्रकारे फासकी लावणाऱ्यांचा वनविभागाने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.03 मे रोजी मौजे तेरवण येथे विजय नारायण सरफरे रा. भू यांच्या मालकीच्या आंबा बागेमध्ये नर जातीचा बिबट्या फासकीमध्ये अडकला असल्याचे आनंद राजाराम पाध्ये यांनी भ्रमणध्वनी वनविभागाला सांगितले.

यानंतर वन विभागाची रेसक्यू टीम तातकाळ घटनास्थळी रवाना झाली.यावेळी घटना स्थळाची पाहणी केली असता, बिबट हा फासकित अडकला असल्याचे दिसून आले. बिबट्या हा त्याच्या हालचाली वरून तसेच फासकी तोडून फासकी लावण्यात आलेल्या आंबा झाडाची फांदी तोडून बागेलगत झुडपामध्ये अडकला असल्याचे दिसून आले. वन विभागाचे अधिकारी व रेसक्यू टिमने या बिबट्यास सुरक्षितरित्या पकडून पिजऱ्यामध्ये बंधिस्त केले. हा बिबटया काही प्रमाणात जखमीही झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button