
एसटी महामंडळाचा पिंपरी-चिंचवड आगाराच्या शिवशाहीच्या बसेसची अवस्था रामभरोसे.
सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाल्याने मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांचे पावले कोकणात वळू लागली आहेत. त्यामुळे रेल्वे बरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसेसनाही प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. उष्म्याचे वाढते प्रमाण, प्रवाशांची गर्दी यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांचा शिवशाही बसचा प्रवासही सध्या खडतर ठरत आहे. पिंपरी-चिंचवड आगारातील शिवशाही बसेस वारंवार प्रवासादरम्यान बंद पडत आहेत. एसटीच्या वातानुकुलीत सेवेसाठी जादा पैसे भरूनही अतिशय वाईट सुविधा प्रवाशांना उपलब्ध होत आहेत, बंद पडलेली वातानुकुलीत यंत्रणा, मळके पडदे, फाटलेली आसन कव्हर आणि कापूस निघालेली आसने यामुळे प्रवाशांमून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
खासगी बससोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने २०१७ मध्ये शिवशाही बस सुरू केली. पहिल्या दिवसापासून शिवशाही टीकेची धनी ठरली. शिवशाहीतील चालक खासगी असल्याने सुरूवातीलाच विविध अपघातांमध्ये सातत्याने शिवशाही चर्चेत येत होती. गाड्यांची अयोग्य देखभाल, बसमधील असुविधा यामुळे शिवशाहीच्या तक्रारी राज्यातून प्राप्त होत आहेत.www.konkantoday.com




