उन्हाळ्याची सुट्टी कोकणात गावाला जाण्यासाठी चाकरमानी निघाल्याने कोकण रेल्वेच्या गाड्या हाऊसफुल्ल!

शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा निकाल मुरुवारी हाती पडल्याने उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमान्यांसह बच्चेकंपनीची पावले मुंबईहून गावाला व गावाकडून मुंबईकडे वळू लागली आहेत. चाकरमान्यांसह बच्चेकंपनी उन्हाळी सुट्टीच्या सफरीवर निघाल्याने कोकण मार्गावरून धावणार्‍या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल हाऊसफुल्लच धावत आहेत. लग्नसराईसह ग्रामदेवतांच्या जत्रोत्सवामुळे कोकण रेल्वेमार्गासह महामार्गावरही वाहनांच्या रहदारीत चौपटीने वाढ झाली आहे. महामार्ग वाहतूक पोलीसही सतर्क झाले आहेत.

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी पडल्याने सार्‍याचीच उन्हाळी सुट्टीच्या हंगामासाठी गावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे. विशेषतः उन्हाळी सुट्टी हंगामात रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ८ एप्रिलाससूनच उन्हाळी स्पेशल गाड्या सोडून चाकरमान्यांसह बच्चेकंपनीला दिलासा दिला आहे एलटीटी-करमाळी, वास्को द गामा-मुजफ्फरपूर, उधना-मंगळूर, एलटीटी-मडगाव, सीएसएमटी-करमाळी, एलटीटी-तिरुवअनंतपूरम उन्हाळी स्पेशल चाकरमान्यांसह बच्चेकंपनीला दिलासा मिळाला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button