
संगमेश्वर येथे मुंबई गोवा हायवे च्या कामाकरिता आणलेल्या मशिनरीतील डिझेल अज्ञाताने चोरून नेले.
संगमेश्वर तालुक्यातील उक्षीफाटा ते वांद्रीफाटादरम्याने चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या डोजर मशिनमधून डिझेल चोरी झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.अज्ञाताविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संगमेश्वर पोलिस ठाण्यात प्रेमचंद दशरथ कोळी यांनी तक्रार दिली आहे. उक्षीफाटा ते वांद्रीफाटा या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी म्हात्रे कंपनीच्या दोन मशिनपैकी सात नंबरच्या मशिनमधील सुमारे ४० लिटर डिझेल व आठ नंबर डोझर मशिनमधील ९० लिटर डिझेल असे एकूण ११ हजार ७०० रुपयांचे डिझेल २९ एप्रिलला अज्ञाताने चोरून नेले, असे तक्रारीत म्हटले आहे.