रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित किड्स सायक्लोथॉनची उत्सुकतारविवारी सकाळी छोटे अंतराळवीर चालवणार सायकल.

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे उद्या रविवारी किड्स सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. या सायक्लोथॉनमध्ये वय वर्षे ६ ते १५ या वयोगटातील जवळपास ४०० छोटे अंतराळवीर सायकल चालवणार असून त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.मुलांनी मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी सुट्टीचा आनंद लुटावा, याकरिता सायकल चालवावी आणि तंदुरुस्त राहावे या उद्देशाने सायक्लोथॉन आयोजित केली आहे. या सायक्लोथॉनचे हे पहिलेच वर्ष असून याची जय्यत तयारी झाली आहे. आज सायंकाळी तारांगण येथे सायकलपट्टूंना बिब नंबरचे वितरण करण्यात येणार आहे.सुवर्णसूर्य फाउंडेशनने या स्पर्धेसाठी छोटे अंतराळवीर चालवणार सायकल (Little Astronauts on Wheels) अशी संकल्पना मांडली. या उपक्रमामधून खगोल विज्ञानाविषयी भरीव माहिती मिळून शालेय विद्यार्थ्यांच्या मनात एक कुतूहल तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सायक्लोथॉनसाठी हिरो सायकल्स, हिंद सायकल ट्रेडिंग कंपनी, सुरस स्नॅक्स, मनहा इंटरनॅशनल, हॉटेल विवेक, आनंदकल्प हॉस्पीटल, फ्लेवर्स आदींचे सहकार्य लाभले आहे.गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे व खगोल अभ्यास केंद्राचे प्रा. बाबासाहेब सुतार यांच्या सहकार्यामुळे “छोटे अंतराळवीर चालवणार सायकल” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात यश आले आहे. देशातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. त्यामुळे उद्या सायक्लोथॉन पाहण्यासाठी व सायकलपट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरीकरांनी आवर्जून या मार्गावर उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे.*10 किमीसाठी मार्ग* (वय वर्ष ११-१५)- तारांगण, माळनाका, मथुरा हॉटेल, शिवाजी स्टेडियमची मागील बाजू, इंद्रधनु अपार्टमेंट, गजानन महाराज मठ, नाचणे रोड, गोडाऊन स्टॉप, शांतीनगर, आनंद कल्प हॉस्पिटल युटर्न आणि पुन्हा तोच रस्ता.*5 किमीसाठी मार्ग* (वय वर्ष ६-१०)- तारांगण, माळनाका, मथुरा हॉटेल, शिवाजी स्टेडियमची मागील बाजू, इंद्रधनु अपार्टमेंट, गजानन महाराज मठ, पॉवर हाऊस नाचणे रोड युटर्न आणि पुन्हा तोच रस्ता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button