रत्नागिरी तालुक्यातील नरबे-गोवळकरवाडी येथे प्रौढावर गैरसमजातून सुरीने वार.

रत्नागिरी तालुक्यातील नरबे-गोवळकरवाडी येथे गैरसमजातून प्रौढावर सुरीने सपासप वार केले. ही घटना सकाळी घडलीगुरुनाथ नारायण शितप (रा.नरबे-गोवळकरवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात नारायण धर्मा धनावडे (55,रा.नरबे-गोवळकरवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित आणि फिर्यादी हे एकाच गावात शेजारी-शेजारी राहतात. यातील संशयिताने फिर्यादीबद्दल गैरसमज करुन घेत त्याच्यावर सुरीने डाव्या कुशीत, बोटावर, उजव्या पायावर सपासप वार केले. त्यानंतर दगडाने कपाळावर मारुन जिवे ठार माण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button