
मुंबईहून राजापूरकडे जाणाऱ्या रिक्षाला अपघात चार जण जखमी.
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडीजवळ रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा संरक्षक कठड्यावर धडकली. हा अपघात शुक्रवारी (ता. २) सकाळी झाला. यामध्ये ४ प्रवासी जखमी झाले.शिवाश बंडबे (वय ५), संगीता भिकू बंडबे (६५), भिकू बापू बंडबे (७५), सुभाष भिकू बंडबे (३४) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. हे सर्वजण मुंबईहून राजापूरकडे जात होते. या अपघाताची माहिती मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी व हेमंत पवार यांना मिळताच रुग्णवाहिका घेऊन अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.




