
मच्छि फॅक्टरीच्या टेम्पो चालकानेच मालकाच्या बोटीकरता लागणार्या तब्बल 30 हजार रुपयांच्या 320 लिटर डिझेलची चोरी करुन परस्पर विक्री केली.
मच्छि फॅक्टरीच्या टेम्पो चालकानेच मालकाच्या बोटीकरता लागणार्या तब्बल 30 हजार रुपयांच्या 320 लिटर डिझेलची चोरी करुन परस्पर विक्री केली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सन 2023 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत राजनगर कोकणनगर व मिरकरवाडा जेटी येथे घडली आहे.
टेम्पो चालक सुबेदार जगदेव निशाद (24, मुळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा.झाडगाव,रत्नागिरी) आणि हसन दर्वे (रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात मालक शाहिद मोहम्मद हुसेन (56,रा.बैतुलअमन अपार्टमेंट गवळीवाडा,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या मच्छि फॅक्टरीच्या टेम्पोवर सुबेदार निशाद हा चालक म्हणून कामाला होता. सन 2023 ते ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत त्याने फिर्यादीच्या चार मच्छिमारी बोटींकरता लागणार्या बॅरलमधील डिझेल संशयित हसन दर्वेला वारंवार विक्री केली. त्याने एकूण 40 बॅरलमधील प्रत्येकी 8 लिटर प्रमाणे 320 लिटरची सुमारे 30 हजार रुपयांना विक्रि केली




