
भारतामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिली नाही. मुस्लिमांना अनेक ठिकाणी त्रास दिला जातोय,पॅलेस्टाईनसोबत आमचा धर्म जुळला आहे-समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना अबू आझमी म्हणाले की, दहशतवादी आरामात आले, पर्यटकांना गोळ्या मारुन निघून गेले.यावर भारत सरकारने चिंतन केले पाहिजे. तसेच पॅलेस्टाईनसोबत आमचा धर्म जुळला आहे, असं वादग्रस्त विधानही अबू आझमी यांनी केलं आहे. दरम्यान फिलिपाईन्सचे झेंडे जाळाल तर विरोध करू, अशी जाहीर भूमिका अबू आझमींनी स्पष्ट केली.
जात विचारून साहित्य खरेदी करायला सांगणारेही दहशतवादी आहेत, असा निशाणा अबू आझमींनी नाव न घेता मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणेंवर साधला. तसेच भारतामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिली नाही. मुस्लिमांना अनेक ठिकाणी त्रास दिला जातोय. देशात धर्म विचारून कारवाई होत असल्याचा आरोप देखील अबू आझमी यांनी केला आहे. अबू आझमींनी केलेल्या या विधानानं आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. तसेच आता भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.




