
पाटपन्हाळे विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप वात्सल्य ट्रस्ट व कोकण कट्टाचे शैक्षणिक उपक्रमासाठी विशेष योगदान.
आबलोली : वात्सल्य ट्रस्ट मुंबईच्या सहयोगातून व कोकण कट्टा मुंबई विलेपार्लेचे संस्थापक अजित पितळे यांच्या सहकार्याने गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील गरीब, गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रंगपेटी, स्केच पेन, दप्तर, खोडरबर, जेवण डबा, पाणी बाटली असे साहित्य देण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. चव्हाण व शिक्षकांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. या वेळी वात्सल्य ट्रस्ट मुंबई व कोकण कट्टा मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे तसेच रत्नागिरी जिल्हा कोकण कट्टाचे संपर्कप्रमुख सुमंत भिडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
मुख्याध्यापिका सौ. चव्हाण यांनी वात्सल्य ट्रस्ट मुंबई तसेच कोकण कट्टा मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले. गरजू , होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेयपयोगी वस्तू वितरीत करून शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी धन्यवाद दिले.