
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये १७३ कोटी ११ लाखांच्या निधीतून ८१ पुलांची कामे हाती.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, लांजा, साखरपा या उत्तर भागातील विविध गावे, वाड्या, वस्त्यांमधील दळणवळण अधिक मजबूत होणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये १७३ कोटी ११ लाखांच्या निधीतून ८१ पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी काही पूर्ण झाली तर काही प्रगतीपथावर आहेत. उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुलांच्या कामाचा सपाटा लावला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (उत्तर) ही कामं पूर्ण झाल्यास उत्तर रत्नागिरी दळणवळणाच्यादृष्टीने पुढारेल. ग्रामीण भागातील अनेक गावे, वाड्यावस्त्या, रस्ते, साकव पूल नसल्याने संपर्कात नाहीत. त्यामुळे अशा गावांचा पायाभूत विकास खोळंबतो. आरोग्य, शैक्षणिक विकास खुंटतो. उत्तर विभागात सुरू असलेल्या ८१ पुलांमुळे संपर्कात नसणारी गावे, वाड्या विकासाच्या प्रवाहात येणार आहेत.