
माणुसकी हाच धर्म पाळणा-या फरीद चा आज होणार सत्कार….
रत्नागिरी : रनपार समुद्रात आपल्याच इथली 16 तरुण फिरण्यासाठी बोटीतून प्रवास करीत होती, दुर्दैवाने बोट समुद्रात बुडू लागली आणि या 16 तरुणांना मृत्यू समोर दिसत होता, अशा प्रसंगी देवासारखा एक दूत फरीद तांडेल याच्या लक्षात ही भयंकर घटना आली आणि त्याने जीवाची पर्वा न करता त्या बुडणा-या 16 तरुणांना सुखरूप पणे किनाऱ्यावर आणले. जात, धर्म याचा विचार करणा-या दुष्ट प्रवृत्ती ला ही चपराक आहे.फरीद ने या तरुणांना जात धर्म नाही विचारले फक्त आपले बांधव संकटात आहेत याचाच विचार केला आणि त्यांना जीवदान दिले अशा या फरीद च्या कार्यामुळे माणुसकी हीच एक जात आहे हे अधोरेखित झाले.
हा संदेश संपूर्ण समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपले ऐक्य अबाधित राहिले पाहिजे….तर मग अशा अवलिया चा सन्मान करण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी व सुहेल मुकादम मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला आज शुक्रवार दि 2 मे रोजी सायंकाळी 7 वाजता सुहेल मुकादम यांचे जयस्तंभ रत्नागिरी येथील कार्यालयात या अवलियाचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे,आपण ही या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.