“न्यूजमेकर्स अचिव्हर्स” पुरस्काराने ना. उदय सामंत सन्मानित

न्यूजमेकर्स ॲचिव्हर्स पुरस्काराने आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांना गौरविण्यात आले. अधिक काम करण्याची उमेद आणि ऊर्जा निर्माण करण्याचे काम हा पुरस्कार करेल, असा विश्वास यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला. मराठी चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे, ही कित्येक वर्षांपासूनची मागणी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पूर्ण करण्यात आल्याचा आनंद असल्याचं मत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी व्यक्त केलं.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड इंटरटेनमेंट समिटच्या (वेव्हज्-२०२५) माध्यमातून मनोरंजनाच्या क्षेत्रातही महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असल्याचं यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं. मराठी साहित्याचा इतर भाषांमध्ये अनुवाद करणारी अकादमी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं पुन्हा एकदा स्थापन करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतल्याचं यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आवर्जून सांगितलं. या अनुवाद अकादमीतून मराठी साहित्य, चित्रपट, नाटके याच्या संहिता आता इतर भाषांमध्ये अनुवादित करू शकतो, त्यासाठी साहित्यिकांना कुठलाही खर्च करावा लागणार नसल्याचंही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी आवर्जून सांगितलं.

मंत्री म्हणून काम करतो हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार असल्याची भावना यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्री. राम लाल जी, माझे सहकारी राज्यमंत्री योगेश कदम जी उपस्थित होते. यावेळी ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर जी, ज्येष्ठ साहित्यिक ज.वि.पवार जी, ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर जी, अनु अग्रवाल जी, झिला बाई वसावे जी यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button