
आणि लांजा शहरातील सर्विस रोड डांबरी ऐवजी होणार काँक्रिटीकरणाचे…!आमदार किरण सामंत यांच्या पाठपुरावानंतर घेण्यात आला निर्णय
*लांजा. *दि.१ मे २०२५*राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना लांजा शहरातील सर्विस रोडचे काम सुद्धा सुरू झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गाला लागत असणारे सर्विस रोड हे डांबरीकरणाचे होणार होते मात्र ते रोड काँक्रिटीकरणाचे करण्याचे व्हावे यासाठी लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. मात्र लांजा शहरातील सर्विस रोड हे डांबरीकरण ऐवजी आता कॉंक्रिटीकरणाचे होणार असल्याचे आज आमदार किरण सामंत यांनी जाहीर केले.
राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे होणारे कॉंक्रिटीकरण हे शहरातील सर्विस रोडला व्हावे ही मागणी किरण सामंत यांनी लावून धरली होती. शहरातील सर्विस रोड हे डांबरीकरणाचे होणार होते मात्र ते सर्विस रोड आता किरण सामंत यांच्या प्रयत्नांमुळे काँक्रिटीकरणाचे होणार आहेत. डांबरीकरण ऐवजी काँक्रीटचे रोड हे चांगल्या पद्धतीने आणि सुस्थितीत टिकून लोकांना आरामदायी प्रवास करता येईल त्यामुळे लांजा शहरातील शहरवासीयांची खड्ड्यातून मुक्तता होण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी हा पाठपुरावा करून काँक्रीटीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. डांबरीकरणाचे रस्ते कमीत कमी तीन ते चार वर्ष टिकतात मात्र काँक्रिटीकरणाचा रस्ता हा 25 ते 30 वर्ष टिकू शकतो या उद्देशाने आमदार किरण सामंत यांनी सर्व्हिस रोड काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. आमदार किरण सामंत यांनी केलेल्या प्रयत्नामुळे लांजावाशी यांच्या खड्डे मार्गावरून आता काँक्रिटीकरणावरून वाहन चालवणे अगदी सोयीस्कर आणि सोपे होणार आहे. त्याबद्दल लांजा वासियांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले आहेत