
सुभाष मुकुंद थरवळ यांनी लिहिलेल्या वैश्य वाणी समाजाची गोत्रावळं पुस्तिकेच प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न
रत्नागिरीतील वैश्य समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री सुभाष मुकुंद थरवळ यांनी कोकणस्थ, कुडाळे आणि गोवा प्रांतातील वैश्य वाणी यांची गोत्रावळे ज्या मध्ये आडनाव गोत्र कुळ आणि कुळ दैवत याची माहिती असलेल्या छोटेखांनी पुस्तिकेच प्रकाशन केले असून या पुस्तिकेच अनावरण लांजा येथील ज्येष्ठ समाज सेवक श्री श्रीराम उर्फ भाऊ वंजारे यांच्या हस्ते विधिज्ञ श्री राजशेखर मलूष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथे बुधवारी अक्षय तृतीयेला करण्यात आले.
या प्रसंगी समाजातील अनेक ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होत्या.
लांज्याहून सर्वश्री जयवंत शेट्ये, कुमार बेंडखळे,विजय खवळे, देवरुखचे श्री अनंत गांधी आवर्जून उपस्थित होते. सर्वश्री राजन शेट्ये, राजन मलुष्टे अशोक प्रसादे ऍड अजित वायकुळ, सुनिलदत्त लाड शरद रेडीज आप्पा ठाकरे दीपक गांगण अजय गांधी विकास मलुष्टे आदी अनेक समाज बांधव या घरगुती स्वरूपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
लग्न पूजा आणि अन्य धार्मिक कार्याच्या प्रसंगी यजमानाला माहिती असणे आवश्यक असलेली स्वतःचे गोत्र कुळ आणि कुलदैवत याची माहिती या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे.
श्री सुभाष थरवळ यांनी वयाच्या 84 व्या वर्षी केलेल्या समाजोपयोगी कौतुकास्पद कार्याबद्दल सर्व उपस्थितानी अभिनंदन केले.