
रिक्षाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी येथील रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर रिक्षाच्या धडकेत पादचार्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. चंद्रकांत राजाराम सुर्वे (६६, रा. तुळसणी ता. संगमेश्वर) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. चंद्रकांत सुर्वे हे २८ एप्रिल रोजी कुवारबाव मुख्य रस्त्यावरुन रेल्वे स्टेशनकडे चालत जात होते. दुपारी ३.३० च्या सुमारास रिक्षाने (एमएच ०८ एक्यु ०७७४) चंद्रकांत यांना जोराची धडक दिली. या अपघातात चंद्रकांत सुर्वे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी रिक्षा चालक राजेश केरु मोहिते (रा. शीळ बौद्धवाडी, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com




