
आरटीई’च्या ७९७ पैकी ५४० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. जिल्ल्यात या आरटीई प्रवेशाच्या एकूण असलेल्या ७९७ रिक्त जागांपैकी तिसर्या फेरीअखेर ५४० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या प्रक्रियेत निवड झालेल्या १२६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवलीय. त्यामुळे जिल्ह्यात २५७ जागांवरील प्रवेश शिल्लक राहिले आहेत.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी खासगी मराठी व इंग्रजी माध्यमाच्याविद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात.
शिक्षण विभागाकडून राज्यस्तरावर ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी १४ जानेवारीपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. जिल्डगवून या प्रवेशासाठी असलेल्या जागांसाठी ९०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिल्या यादीत ६०४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्या यादीतील ४७४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यानंतर पहिल्या यादीतील निवड झालेले ८० विद्यार्थी प्रतीक्षा यादीवर करण्यात आले. तर निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील दुसर्या फेरीत १३ विद्यार्थी होते. त्यानंतरही दुसर्या प्रतीक्षा यादीतील ७ विद्यार्थी होते. या सार्या प्रक्रियेत एकूण ३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले. १२६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रक्रियेला प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात तिसर्या फेरीअंती एकूण ५४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. अजूनही या प्रवेशाच्या एकूण २५७ जागा शिल्लक राहिल्या आहेत.www.konkantoday.com