
राजापूर अर्बन बँकेचे संचालक प्रकाश कातकर यांचे निधन.
. राजापूर येथील अर्बन बँकेचे संचालक व प्रसिद्ध व्यापारी व परोपकारी व्यक्तीमत्व असलेले प्रकाश रामचंद्र कातकर (५३) यांचे सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील ऍस्टर दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले. मेंदुतील रक्तस्त्रावामुळे आधी रत्नागिरी व त्यानंतर कोल्हापूर येथे त्यांना हलविण्यात आले होते. अनेकांसाठी आधारवड ठरलेले, अनेकांचे संसार मार्गी लावणारे, तरूणांच्या हाताला काम देणारे सामाजिक कार्यकर्ते असलेल्या कातकर यांच्या अचानक निधनाने निकटवर्तीयांसह तालुक्याला मोठा धक्का बसला.www.konkantoday.com