
यमुनाबाई ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद -न्यायाधीश माणिकराव सातव.
ट्रस्टचे काम करताना खुर्चीला चिकटून राहणारे नकोत तर समाजासाठी काहीतरी देणारे विश्वस्त आवश्यक आहेत. एखादी संस्था चांगली असली की तिचा आधार समाजातील अनेक कुटुंबांना होत असतो. त्यामुळे त्यांनी असे काम करत राहिले पाहिजे. यमुनाबाई खेर ट्रस्टचे कार्यही कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच सचिव, न्यायाधीश माणिकराव सातव यांनी केले. सर्वोदय छात्रालयाच्या सभागृहात रविवारी सायंकाळी श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.सातव यांच्या हस्ते पेढे-परशुराम (ता. चिपळूण) येथील आरती निराधार सेवा फाऊंडेशनच्या संस्थापिका अनिता आत्माराम नारकर यांना श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचा यमुनाबाई खेर पुरस्कार प्रदान करण्यात आला.www.konkantoday.com