
मेच्या पहिल्या आठवड्यात भाजपचा दक्षिण जिल्हाध्यक्ष ठरणार, पदाधिकार्यांनी बंद लखोट्यात केले मत व्यक्त.
भाजपा तालुकाध्यक्षपदांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर झालेल्या असताना सोमवारी रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी मते जाणून घेण्यात आली. या वेळी १७ पदाधिकार्यांकडून लिफाफ्यात नावे बंद करून घेण्यात आली असून, राज्य कार्यकारणीकडून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजपा जिल्हाध्यक्षपदाचे नाव जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रत्नागिरीच्या कार्यालयात जिल्हाध्यक्षपदासाठी प्रदेश व जिल्हास्तरीय पदाधिकार्यांची मते जाणून घेण्यात आली. यात या पदाधिकार्यांकडून संभाव्य जिल्हाध्यक्ष म्हणून नावे कागदावर लिहून तो बंद लिफाफा घेण्यात आला. ही प्रक्रिया राबविण्यासाठी ठाण्यातील आमदार संजय केळकर, भाजपाचे संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, माजी आमदार प्रमोद जठार आदी पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com