
टीकलेश्वर देवस्थान परिसरातील पन्नास वर्षे प्रलंबित असलेले विद्युतीकरणाचे स्वप्न अखेर पूर्ण.
टिकलेश्वर देवस्थान परिसरातील पन्नास वर्षे प्रलंबित असलेले विद्युतीकरणाचे स्वप्न अखेर साकार झाले. आमदार शेखर निकम यांच्या अथक पाठपुराव्यामुळे हे महत्वपूर्ण काम मार्गी लागले. ४५ लाख रुपयांच्या निधीच्या माध्यमातून परिसरात विद्युतीकरण झाले. या उदघाटन समारंभात ग्रामस्थ, भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या ऐतिहासिक क्षणी सर्वांनी समाधान व्यक्त केले.आमदार शेखर निकम यांनी या कार्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीचे महत्व सांगून मान्यवरांचे आभार मानले. पालकमंत्री ना. उदय सामंत, महायुतीचे सर्व पदाधिकारी यांचे त्यांनी विशेष आभार मानले.www.konkantoday.com