
खडपोलीतील कृष्णा कंपनीत भाजलेल्या पाच कामगारांपैकी एका कामगाराचे निधन
चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील कृष्णा अँटीऑक्सिडेंटस प्रा. लि. कंपनीत केमिकल ड्रम फुटल्याने भाजलेल्या पाच कामगारांपैकी नवी मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या संजय यशवंत सुर्वे या कामगाराचे बुधवारी सायंकाळी निधन झाले.जखमींना शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यातील तिघा कामगारांना नवी मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. यातील सुर्वे यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. गुरूवारी सकाळी अलोरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. www.konkantoday.com