जनरेटरच्या इंधनाअभावी मंडणगड ग्रामीण रूग्णालयाची सेवा ठप्प.

इंधनाअभावी मंडणगड ग्रामीण रूग्णालयाची रूग्णवाहिका सेवा वेळोवेळी ठप्प होत असल्याने रूग्णांची हेळसांड होते. जनरेटरसाठी इंधन उपलब्ध होत नसल्याने रूग्णालयाच्या सेवा ठप्प रहात असल्याने या संदर्भात नगरसेवक आदेश मर्चंडे यांनी नागरिकांसह रूग्णालयावर धडक देत रूग्णालय व्यवस्थापनास जाब विचारला. यामुळे होणारी गैरसोय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली.ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे यांच्याशी नागरिकांनी रूग्णालयातील विविध प्रश्‍नांबाबत चर्चा करताना समस्या मांडल्या. १०८ रूग्णवाहिकेच्या सेवेसंदर्भात प्रश्‍न उपस्थित करण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button