
खेड येथील रेल्वेस्थानकात मोबाईल लांबवणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात.
खेड येथील रेल्वेस्थानकातील आरक्षण खिडकीजवळ रांगेत उभ्या असणार्या एका प्रवाशाचा मोबाईल लांबविणार्या चोरट्यास सोमवारी सायंकाळच्या सुमारास स्थानकातील काही जागरूक नागरिकांनी शिताफीने पकडून पोलीस ठाण्यात आणले. या चोरट्याकडे आणखी दोन चोरीचे मोबाईल देखील सापडले असून पोलिसांनी दोन्ही मोबाईल ताब्यात घेतले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत चोरट्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया येथील पोलीस ठाण्यात सुरू होती.
प्रवाशाचा चोरलेला मोबाईल संबंधित मालकाच्या ताब्यात देण्यात आला. चोरीस गेलेल्या प्रवाशाने रितसर तक्रार देण्यास नकार दिल्याचे समजते अन्य चोरलेले दोन मोबाईल कोणाचे याचा पोलिसांकडून सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरू होते. यामुळे अधिक तपशील उपलब्ध होवू शकला नाही.www.konkantoday.com




