
रत्नागिरी नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या वॉर्ड नंबर ५ मध्ये पोटनिवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू
नगराध्यक्ष बंड्या साळवी यांची थेट नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याने त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे वॉर्ड नं. ५ मधील नगरसेवक पदाची जागा रिकामी झाली होती. आता त्यादृष्टीने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या प्रभागातील ४ हजार मतदारांची प्रारूप यादी करण्याच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com