रात्री अकरानंतर जर कोणी मेडिकल दुकानदार शीतपेय विकताना आढळला तर त्याला 50 हजार रुपये दंड.

24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना आता रात्री 11 नंतर शीतपेय विकता येणार नाहीत. रत्नागिरी पोलिसांनी दिवस-रात्र सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना नोटीसा बजावून रात्री 11 नंतर शीतपेय विकू नयेत अशा सूचना दिल्या आहेत. अंमली पदार्थाच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. डिप्रेशनच्या गोळ्या शीतपेयात टाकून त्याची नशा करणारी मंडळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही मोहिम उघडण्यात आली आहे.24 तास मेडिकलच्या नावावर जनरल स्टोअर्स चालवणाऱ्यांची पोलिसांनी झोप उडवली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. पोलिसांकडून कारवाई सुरू असताना आणखी एक माहिती पुढे आली ती म्हणजे डिप्रेशनच्या गोळ्या शीतपेयात टाकून शीतपेय नशा म्हणून प्यायली जातात.रात्री उशीरा काही मेडिकलमध्ये शीतपेय मिळतात. ही शीतपेय घेऊन नशाबाज मंडळी नशा करतात. त्यामुळे पोलिसांनी 24 तास सुरु असलेल्या मेडिकल दुकानांना नोटीसा काढून त्यांची झोप उडवली आहे. अशा मेडिकलना 24 तास फक्त औषधे विकण्यासाठीच परवानगी असते. अन्य वस्तू अर्थात शीतपेय आणि आईस्क्रीम विकायला परवानगी नसते.पण अनेक मेडिकल दुकानदार रात्रभर औषधांपेक्षा जनरल स्टोअर्सची सेवा देतात. अशा सर्व 24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल दुकानांना नोटीसा काढून रात्री 11 नंतर शीतपेय विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री अकरानंतर जर कोणी मेडिकल दुकानदार शीतपेय विकताना आढळला तर त्याला 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button