
महाराष्ट्र राज्यातील शाळांना ०२ मे ते १६ जून कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर
मुंबई २९ :- राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्याथ्यर्थ्यांना शुक्रवार, दि.०२ में, २०२५ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे श्रीराम पानझडे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचालनालय म.रा., पुणे. आणि (शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय) म.रा., पुणे. यांनी परिपत्रकाद्वारे कळवले आहे. त्यानुसार राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा. असेही नमूद करण्यात आले आहे.
पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२५- २६ मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि.१६ जून २०२५ रोजी सुरु करण्यात येतील.
तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, दि. २३ जून २०२५ ते २८ जून २०२५ पर्यंत सकाळ सत्रात ७.०० ते ११.४५ यावेळेत सुरु करण्यात याव्यात. सोमवार दि.३०.०६.२०२५ पासून नियमित वेळेत सुरु करण्यात याव्यात. असे कळविण्यात आले आहे.
विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १६ जून २०२५ रोजी सुरू करण्यात याव्यात असे नमूद केले आहे. जिल्हा परिषद रत्नागिरीच्या सर्व मराठी व उर्दू प्राथमिक शाळांना उन्हाळी सुट्टी शुक्रवार दि. २.५.२०२५ पासून शनिवार दि. १४.६.२०२५ पर्यंत लागू राहील. या बाबतचे परिपत्रक (बी. एम. कासार) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी जारी केले आहे.