
भारती तायशेटे यांना नॅशनल अवॉर्ड्स गोवा यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
जि.प.शाळा, पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी या शाळेच्या पदवीधर शिक्षिका व मुख्याध्यापिका भारती तायशेटे यांना गोवा गव्हर्मेंट पीडब्ल्यूडी स्टाफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड गोवा , इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी रजिस्टर बेळगावी, नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन रजिस्टर बेळगावी यांच्यामार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षिका राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा गोवा या ठिकाणी प्रदान करण्यात आला व उत्साहात पार पडला. दिल्ली ,गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातील उल्लेखनीय व चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
हा पुरस्कार सन्मानपूर्वक गोवा या ठिकाणी श्रीम. भारती तायशेटे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्र, समाजातील विविध घटक,पूर्णगड ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती पूर्णगड नं.१ , ग्रामस्थ, पालक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचा व गावाचा मान वाढला आहे. शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या भारती तायशेटे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे . त्यांच्या या कार्यात मदत करणारे शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांचे मोलाचे सहकार्य आहे. तसेच त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे पती विजय जाधव सर यांचाही मोलाचा वाटा आहे.
त्यांच्या या यशाबद्दल प्राथ.शिक्षणाधिकारी मा.कासार साहेब, उपशिक्षणाधिकारी मा.शिरभाते मॅडम,उपशिक्षणाधिकारी मा.कडव साहेब गटशिक्षणाधिकारी मा.प्रेरणा शिंदे,शिक्षण विस्तार अधिकारी मा.प्रा.एस.जे. मुरकुटे साहेब,पावस बीट शिक्षण विस्तार अधिकारी सायली सावंत मॅडम(माजी), सशाली मोहिते मॅडम, हिरवे मॅडम, माजी केंद्रप्रमुख दीपक गुरव सर, उल्हास पाटील सर आजी केंद्रप्रमुख संजय राणे सर यांनी कौतुक केले आहे.