
नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकणार हे निश्चित झाले.
सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. हा तिढा सुटण्याचे संकेत मिळाले आहे कारण येत्या एक मे रोजी नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकणार हे निश्चित झाले आहेनाशिकच्या पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली.
पण नाशिकसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भूसे, तर रायगडसाठी शिंदेंचे शिलेदार भरत गोगावले हे इच्छुक आहेत.त्यामुळे महाजन आणि तटकरे यांच्या नियुक्तीला काही दिवसानंतर स्थगिती देण्यात आली. आता या पदावर कुणाची वर्णी लागते यांची चर्चा सुरु असताना महाजन आणि तटकरे यांचेच नाव पुन्हा फायनल झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्र दिनी तरी या दोन्ही नेत्यांच्या हस्ते त्यांचा जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.