
जिल्हा किड्स अॅथलेटिक्स स्पर्धा ३० रोजी डेरवणात
. रत्नागिरी : लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व ते तंदुरुस्त आणि आत्मविश्वासाने भरलेले राहावेत, यासाठी जागतिक ॲथलेटिक्स आणि ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनने किड्स ॲथलेटिक्स ही संकल्पना सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३ री रत्नागिरी जिल्हा किड्स अॅथलेटिक्स स्पर्धा ३० रोजी डेरवण येथील एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकादमीमध्ये आयोजित केली आहे.डेरवण येथे होणारी ही स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.
या स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघीक असे दोन गट आहेत. त्यामध्ये ७ वर्षांखालील वयोगटात ३ मे २०१८ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले आणि ११ वर्षांखालील वयोगटात ३ मे २०१४ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडून सहभागी होऊ शकतात. यातील सर्व कार्यक्रम निव्वळ मनोरंजन म्हणून घेतले जाणार आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी ५० रुपये प्रति प्रवेश शुल्क आहे. यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांनी केले आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे अपेक्षित आहे. त्यासाठी उद्या आज (२९ एप्रिल) सायंकाळी ५ वाजेपूर्वी अंतिम मुदत आहे. नोंदणीसाठी लिंक पुढीलप्रमाणे आहे. त्यावर अर्ज भरावेत. docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeQp6l1nc2kDt10DtIOkRRLQx9QVaO_I8xjgP3KvE-vZ0OL2w/viewform?usp=dialog.
आंतरराष्ट्रीय हौशी ॲथलेटिक्स फेडरेशनने (IAAF) जागतिकस्तरावर ७ मे हा दिवस “किड्स ॲथलेटिक्स दिन” म्हणून घोषित केला आहे. यानिमित्त लहान मुलांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हौशी ॲथलेटिक्स फेडरेशन व ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोन वयोगटात मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोरोनानंतर मुले मैदानावर येणे कमी झालेली आहेत. त्यावर उपाय म्हणून शारीरिक तंदुरुस्तीकडे मुलांना घेऊन गेल्यास ती मजबूत होतील आणि आजारांचा धोकेही कमी होतील. मैदानी खेळ खेळल्यामुळे मुलांचा ताण कमी होतो. म्हणूनच मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी मैदानावरील खेळ खूप महत्त्वाचे आहे.
ॲथलेटिक्स एक चांगला आणि मजेदार खेळ असून या खेळांमुळे मुलांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास साधता येतो. यासाठी मुलांनी ॲथलेटिक्समध्ये सहभागी होण्यासाठी पालक, शिक्षक, प्रशिक्षक यांनी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मुलांसाठी धावण्याची आणि शारीरिक हालचालीची (ATHLETICS) महत्त्वपूर्ण भूमिका असते. धावल्याने आणि खेळल्याने मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक विकास होतो, तसेच त्यांची ऊर्जा आणि उत्साह वाढतो. हे लक्षात घेऊनच या स्पर्धा घेण्यात येत आहेत.- स्पर्धेसाठीचे वयोगट :- लेव्हल १ (४ ते ७ वर्षे)* हिट द टार्गेट (५ मी)* ट्रीझर हंट (५ मी)* लिंबू चमचा (१५ मी)- लेवल २ (वयोगट ८-११) *हिट द टार्गेट (१० मी)* पोत्यात पाय घालून उडी मारत धावणे (१५ मी), * वॉटर स्प्ल्याश (२० मी)*