
कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतसह तेजस एक्स्प्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार १० जूनपासूनचे आरक्षण अखेर खुले झाले.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतसह तेजस एक्स्प्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार १० जूनपासूनचे आरक्षण अखेर खुले झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ दूर झाला आहे. कोकण मार्गावर दि.१० जून ते दि. ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी होते. रेल्वेचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी खुले होते. मात्र, गाड्यांचे पावसाळी वेळापत्रकच जाहीर न झाल्याने सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह तेजस व एलटीटी-एक्स्प्रेसची पावसाळ्यातील आरक्षित तिकीटच मिळत नव्हती.मात्र, आयआरसीटीच्या संकेतस्थळावर १० जूननंतरच्या दोन्ही गाड्यांचे आरक्षण सुरू प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.