
रत्नागिरी जिल्ह्यातील डीएड्, बीएड्धारकांना भरतीत प्राधान्याने स्थान देण्यात यावे,- डीएड्, बीएड् संघटनेची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील डीएड्, बीएड्धारकांना भरतीत प्राधान्याने स्थान देण्यात यावे, अशी मागणी डीएड्, बीएड् संघटनेने केली आहे.तसे न केल्यास १५ ऑगस्टला बेरोजगार संघटना आंदोलन करेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील जवळजवळ साडेसातशे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने परजिल्ह्यात गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा दरवाजा उघडण्यासाठी प्राथमिक शिक्षक उपलब्ध नव्हता. या जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या निर्णयामुळे जिल्ह्याचा शैक्षणिक समतोल बिघडवला. या जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती विस्कळीत झालेली पाहून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी स्थानिकांना साद घातली आणि स्थानिक म्हणून प्रतिसाद दिला. ९ हजार रुपये मानधनावर प्रामाणिकपणे काम केले. जिल्हा परिषदेने अनेकवेळा मानधन देताना टाळाटाळ केली. कडक नियम लावले. त्याचा प्रचंड मानसिक ताण व त्रासही झाला.