
एसटी महामंडळाचे चाक आता तोट्यात रूतत चालले
सर्वसामान्यांचे वाहन म्हणून एसटी म्हणजे लालपरी ग्रामीण भागापासून शहरापर्यंत लोकप्रिय आहे. परंतु येत्या काही वर्षात चुकीची धोरणे, गैरव्यवहार, खाजगीकरण व वेगवेगळ्या करांच्या बोजाखाली एसटी दिवसेंदिवस हजारो कोटी रुपयांच्या तोट्यात गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे रखडत चाललेली एसटीची वाटचाल ठप्प होवून एसटी महामंडळ आता संकटात आले आहे. राज्यात एसटीने ६७ लाख लोक रोज प्रवास करीत होते. सध्या एसटी ७ हजार कोटी रुपयांच्या तोट्यात असून लॉकडाऊनमुळे आणखीन त्यामध्ये २ हजार कोटी रुपयांच्या तोट्याची भर पडली आहे. या सर्वांमुळे एसटी व त्यावर अवलंबून असलेल्या कर्मचार्यांचे भवितव्य आता धोक्यात आले आहे.
www.konkantoday.com