
बशीर मुर्तुजा यांची सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात (मुंबई) नियुक्ती पत्र प्रदान.
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव तसेच देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते बशीर मुर्तुझा यांची पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे. निवडीचे पत्र मुंबई येथे पक्ष कार्यालयात देण्यात आले.बशीर मुर्तुझा हे शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. पक्षासाठी आजवर दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नियुक्ती वरती सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे.पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल, असा मला ठाम विश्वास वाटतो, असा विश्वास या नियुकी पत्राच्या माध्यमातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.यावेळी प्रदेशचे रवींद्र पवार, रत्नागिरी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, नीलेश कानिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.