
राजापूर तालुक्यातील वाडीखुर्द गावातील १२५ हेक्टर (३०८ एकर) जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित
महाराष्ट्र सरकारने गुरुवारी राजापूर तालुक्यातील वाडीखुर्द गावातील १२५ हेक्टर (३०८ एकर) जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित केली आहे. ही जमीन प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाच्या जागेपासून ५ किलाेमीटर अंतरावर आहे, ज्याला गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे.राज्य सरकारने काढलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, वाडी खुर्द गावातील विशिष्ट क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अंतर्गत औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे२०१९ मध्ये महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने बारसू, सोलगाव आणि इतर गावांचा काही भाग औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केला होता. त्यानंतर आता पुन्हा राजापूर तालुक्यातील वाडीखुर्द गावातील ३०० एकर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.




