
चिपळूण सायकलिंग क्लबच्या दोघा पदाधिकार्यांनी टँडम सायकलवरुन केला कुंभार्ली पार.
चिपळूण सायकलिंग क्लबमार्फत ४ मे २०२५ रोजी आपल्या देशात प्रसिद्ध असलेल्या ’कुंभार्ली घाटाचा राजा’ या सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या रेसचे ४थे वर्ष असून गेली ३ वर्षे चिपळूण सायकलिंग क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी न चुकता आयोजित केली जाते. ज्यामध्ये भारतातल्या कानकोपर्यातून तसेच काही विदेशी खेळाडूदेखिल यात सहभागी होत असतात. या स्पर्धेत खेळाडूंना चिपळूणचा प्रसिद्ध असा कुंभार्ली घाट सायकलने सर करायचा असतो, अल्पवाधीतच या स्पर्धेने आपलं नाव देशभरात केले आहें आणि दरवर्षी खेळाडूंचा सहभाग वाढतच चालला आहे.सध्या काही खेळाडू याच स्पर्धेचा सराव म्हणून चिपळूण येथे राहायला येऊन घाट सर करीत असतात.
अशाचवेळी चिपळूण सायकलिंग क्लबचे उपाध्यक्ष सायकल सम्राट श्री. प्रशांत दाभोळकर आणि कार्यकारिणी सदस्य एस. आर. योगेश ओसवाल यांनी या आगळ्या वेगळ्या टॅडम अशा सायकलवरती ३१ किलोमीटरचे अंतर २ तास ५३ मिनिटे सायकल चालवून हा घाट चिंचनाका शिवसृष्टी पासून न थांबता सर केला.सायकल म्हणजे एकावेळी दोन लोकांना दोन पेडल मारायला असणारी जवळपास ३० किलीची एकच मोठी सायकल अशा सायकलवरती विशालकाय घाट चढण्याचा पराक्रम चिपळूण सायकलिंग क्लबचे प्रशांत दाभोळकर व योगेश ओसवाल या सायकलपटूंनी केला आहें. अशा त-हेने सायकलने कुंभार्ली घाट न थांबता चढण्याचा पहिले सायकलपटू ठरले आहेत.www.konkantoday.com