
इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे कारवांचीवाडी येथे हॅप्पी स्कूल प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न.
2024 मध्ये रत्नागिरी स्थापन झालेल्या इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन मार्फत स्थापनेनंतर पहिल्याच वर्षी रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये हॅप्पी स्कूल प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा 19 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाला. शाळेतील मुलांचे शिक्षण हसत खेळत आणि आनंदाने व्हावे यासाठी ह्या प्रकल्पाअंतर्गत शाळेच्या वर्ग खोलीत तसेच व्हरांड्यामध्ये शैक्षणिक चित्रे काढून वर्गाचे पूर्ण रंगकाम करून दिले तसेच मुलांना खेळण्यासाठी अनेक खेळणी दिली. प्रकल्पाचे उद्घाटन इनरव्हील संस्थेच्या जिल्हा अध्यक्षा सौ. ज्योतीकिरण दास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतर्फे इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना करे आणि सौ. ज्योती किरण दास यांचा सत्कार करण्यात आला.
शाळा समितीचे अध्यक्ष दशरथ दिलीप बारगोडे उपाध्यक्ष मनस्वी महेश कांबळे तसेच पोमेंडी गावच्या सरपंच सौ. ममता जोशी, इतर ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक जाधव सर, इतर शिक्षक वृंद, शाळेतील कर्मचारी आणि पालक वर्ग या सर्वांनी इनरव्हील क्लब तर्फे केलेल्या या प्रकल्पाचे कौतुक करून धन्यवाद दिले. इनरव्हील क्लब तर्फे अध्यक्षा डॉ. स्वप्ना करे यांनी मनोगत व्यक्त करताना क्लबचे सेक्रेटरी सौ रुचा गांधी, खजिनदार सौ. सुवर्णा चौधरी, डॉ. प्रियांका कांबळे, सोनाली आयरे, रेखा साळुंखे, रिया गांधी, मंजिरी पाडळकर, प्रज्ञा गांधी, तन्वी साळुंखे, यज्ञा माणगावकर, अपूर्वा सुर्वे, आशा सनगर आणि इतर सर्व क्लब मेंबर्स यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या प्रकल्पात सहकार्य करणाऱ्या रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊनचे सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानले. तसेच अशाच प्रकारचे अधिकाधिक सामाजिक उपक्रम येणाऱ्या काळात क्लब तर्फे केले जातील असा विश्वास व्यक्त केला.




