
वापरात नसलेल्या नौकांचे नंबर वापरून अन्य नौकांकडून मासेमारी, मत्स्यविभागाकडे तक्रार दाखल.
मासेमारीसाठी वापरात नसलेल्या मच्छिमार नौकांचे नाव नंबर वापरून दुसर्याच बेकायदेशीर नौका मासेमारी करीत असल्याचा घोळ ड्रोन कॅमेराने टिपलेल्या छायाचित्रावरून उघड झाला आहे. ड्रोन कॅमेर्याने टिपलेल्या छायाचित्रानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने सुनावणीसाठी येण्याची नोटीस मालकांना आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी संबंधित नौका मालकांनी पोलिस अधीक्षकांसह सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.रत्नागिरीच्या समुद्रात अल फातिमा नावाची नौका प्रतिबंधित क्षेत्रात मासेमारी करत असल्याचे ड्रोन कॅमेर्यातून टिपलेल्या छायाचित्रातून स्पष्ट झाल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाकडून सुनावणी कार्यवाहीसाठी नौका मालकांना नोटीस देण्यात आली.
नौका मालक मुस्ताक मोहम्मद वस्ता यांना ही नोटीस मिळाली.नोटीस मिळाल्यानंतर नौका मालक सुनावणीसाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त तथा अधिनिर्णय अधिकार्यांसमोर गेले असता त्यांनी आपल्या नौकेबाबत माहिती दिली. त्यांची अल फातिमा नावाची नौका वर्षभरापूर्वीच समुद्रात लाटेच्या मार्याने समुद्रात वाहून जात बुडून पूर्णतः नष्ट झाली आहे. ही माहिती त्यांनी अभिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांसमोर मांडली. त्याचबरोबर आपल्या नौकेचे नाव नंबर वापरून कोणीतरी बेकायदेशीर नौकेने मासेमारी करत असल्याची लेखी तक्रारही केली आहे. सागरी सुरक्षेच्यादृष्टीने हीच तक्रार पोलिस अधीक्षकांकडेसुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने तपासणी करण्याची विनंतीही तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.www.konkantoday.com