
भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळणार?
महाराष्ट्रात भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झालं. याला भाजपाने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. यानंतर आता याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर मत व्यक्त केले आहे त्यामुळे भाजपाच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळण्याची शक्यता तयार झालीय. सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींचं ६० दिवसांपेक्षा अधिक निलंबन योग्य नाही, असं मत नोंदवलं आहे. या याचिकेवर १८ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
www.konkantoday.com