
अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी कोंकण किनारपट्टी भागात ड्रोनची गस्त घालण्याचा शासनाचा निर्णय
राज्याच्या सागरी जलाधी क्षेत्रात गेली कित्येक वर्षे सुरू असलेल्या अनधिकृत परप्रांतीय हायस्पीड, पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीला कायमस्वरूपी चाप बसावा, यासाठी शासनाने अत्याधुनिक ड्रोनद्वारे गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने निविदाही मागविली आहे. त्यामुळे नव्या मत्स्य हंगामापासून राज्याच्या किनारपट्टी भागात ड्रोन पर्वाची सुरूवात होणार आहे. यासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना प्रत्येकी २ ड्रोन देण्यात येणार आहेत. त्याद्वारे नियमित गस्त घातली जाणार आहे.राज्याला ७२१ किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टी भागात वर्षानुवर्षे मासेमारी व्यवसाय केला जात आहे. देशाला परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसायाकडे बघितले जाते. पूर्वी पारंपारिक पद्धतीने मासेमारी केली जात होती. त्यात कालांतराने यांत्रिकीकरणाची भर पडली. ट्रॉलर्स पद्धतीने मासेमारी सुरू असतानाच गेल्या काही वर्षात कोकण किनारपट्टी भागातील जलधी क्षेत्रात परप्रांतीय हायस्पीड, पर्ससीन एलईडीद्वारे अवैधरित्या मासेमारीला सुरूवात झाली.www.konkantoday.com