
पाकिस्तान मुर्दाबादचा नारा देत, पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवून रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी केलापहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना प्राण गमवावे लागल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत शनिवारी तालुक्यातील मुस्लीम समाजाच्यावतीने पाकिस्तान मुर्दाबादचा नारा देत, पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवून निषेध केला. भारतीय मुस्लीम व हिंदू बांधवांमध्ये फुट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याने, हल्लेखोरांना पकडून कडक शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी भारत माता की जय म्हणत मुस्लीम समाजाने घटनेचा निषेध केला.रत्नागिरीतील मारुती मंदिर चौकात शेकडो मुस्लीम बांधव व भगिणींनी एकत्र येत पहलगाम येथील दहशतवादी घटनेचा निषेध केला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या.

पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवत भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना मुफ्ती तौफिक सारंग म्हणाले की धर्म विचारुन जी घटना केली गेली ती मानवता विरोधी असून त्याचा आम्ही निषेध करतो, हिंदुस्थानी मुस्लीमांशी काही संबंध नसून हा दहशतवाद असून मुस्लीम धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

इस्लामशी याचा काहीही संबंध नसून, या घटनेशी संबंधित सर्वांना कठोर शिक्षा मिळावी अशी सर्व भारतीय मुस्लीमांची ईच्छा असल्याचे मुफ्ती तौफिक सारंग यांनी सांगितले.यावेळी सलीम मिरकर, शराफत गडबडे, सोहेल साखरकर, अल्ताफ संगमेश्वरी, सोहेल मुकादम, अजिम चिकटे, शोहेब खान, झाकी खान, रझ्झाक काझी, उबेद होडेकर, उझैफ साखरकर, मुसा काझी, यासीन मजगावकर, फरहान मुल्ला, फय्याज मुकादम, मुज्जू मुकादम, तबरेज सोलकर, सुफियान नागलेकर, फरझाना डांगे, सायमा चिकटे, बशीर मुर्तुझा, सुफियान बारगीर, नदीम सोलकर, इद्रीस फजलानी, अस्लम मेमन, असीफ अकबानी, मझहर मुकादम यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव व भगिनी उपस्थित होत्या.
