
जगातील हवामानशास्त्रज्ञ चिंतेत, आगामी तीन महिन्यांत जगभरात तापमान आणखी वाढणार!.
मुंबई :* पुढील तीन महिन्यांत जगभरात तापमानातील वाढ अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वर्तवला आहे. उत्तर दक्षिण प्रशांत, पूर्व आशिया आणि अरब या भागातही उष्णता उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मे ते जुलै २०२५ या कालावधीत जगातील बहुतांश भागात पारा वाढू शकतो असा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेने व्यक्त केला आहे. सध्या तापमानवाढ हा हवामानतज्ज्ञ, अभ्यासक यांच्या चिंतेचा विषय झाला आहे.
वाढत्या उष्णतेचे परिणाम मानवी आरोग्य तसेच शेतीवर होत आहेत. त्याचबरोबर तापमानवाढीतील उच्चांकही दिवसेंदिवस विविध भागात नोंदवले जात आहेत.भारतावरील परिणामभारताच्या काही भागांत मे ते जुलै या कालावधीत तापमान अधिक राहील. त्यामुळे वाढणारी उष्णताही असह्य असेल. तसेच पावसाच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. या तीन महिन्यांत सर्वाधिक पावसाचा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेने व्यक्त केला आहे.*
*जगाच्या अनेक भागांत जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत समुद्राचे आणि पृष्ठभागावरील तापमान सामान्यापेक्षा अधिक नोंदले गेले. मध्य प्रशांत महासागरात काही भागांमध्ये तापमान सामान्य होते. यामुळे त्या भागात उष्णतेचा प्रभाव तुलनेने कमी होता. मात्र, प्रशांत महासागराच्या पूर्व भागांमध्ये आणि मध्यभागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यापेक्षा अधिक होते. तसेच नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान मध्य व पूर्व प्रशांत महासागर वगळता जगाच्या बहुतांश भागात पृष्ठभागाचं तापमान सामान्यापेक्षा अधिक होते. येत्या काळातही बहुतांश महासागरांतील पृष्ठभागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते, असा जागतिक हवामान विज्ञान संघटनेने इशारा दिला आहे. त्यामुळे सामान्यतः बहुतांश भागात उष्णतेच्या झळा तीव्र असू शकतात.
भारतात उष्णतेची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानेही वर्तवली आहे. परंतु जागतिक हवामान विज्ञान संघटनेने दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेच्या काही भागात तापमान सामान्यापेक्षा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र उष्णतेची तीव्रता अधिक नसेल, असेही जागतिक हवामानशास्त्र संघटनेने स्पष्ट केले आहे.उत्तर आफ्रिका, मादागास्कर, आशिया (भारतीय उपमहाद्वीप वगळता) दक्षिण अमेरिका, कॅरेबियन, मध्य अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड आणि युरोपमध्ये सामान्यापेक्षा जास्त तापमानाची नोंद होऊ शकते.*
** पूर, चक्रीवादळे, वणवे, दुष्काळ यांसारख्या आपत्ती अधिक तीव्र आणि वारंवार घडतात.* शेती उत्पादनावर व जलस्रोतांवर परिणाम होतो, ज्यामुळे अन्नधान्य व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होतो.* उष्णतेशी संबंधित आजार जसे की, उष्माघात, त्वचा विकार, श्वसनाचे विकार आदींचे प्रमाण वाढते.* अनेक प्राणी आणि वनस्पती प्रजाती नष्ट होतात किंवा स्थलांतर करतात.* शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठे आर्थिक नुकसान होते.* उष्ण हवामानामुळे वायू प्रदूषणाची पातळी वाढते, ज्याचा श्वसनावर परिणाम होतो.