गांजा विकणारे रत्नागिरीतील तिघेजण पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

रत्नागिरी : गांजा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगलेल्या तिघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. अत्ताउल्ला सलिम पटेल (३५ वर्षे, रा. उद्यमनगर, ता. जि. रत्नागिरी), (फहाद मुस्ताक पाटणकर (२७, शिवाजीनगर, ता. जि. रत्नागिरी), आयान अजिज मुल्ला (२४, रा. उद्यमनगर, ता. जि. रत्नागिरी) अशी त्यांची नावे असून, या तिघांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे रत्नागिरी शहरात गस्त घालत आहेत. २६ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करीत असताना पटवर्धन वाडी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाणाऱ्या रस्त्यावर उद्यमनगर येथे तिघेजण दोन दुचाकींवर संशयित हालचाली करताना दिसून आले.या पथकामार्फत संशयितांची खात्री करता त्यांच्याकडे ३५३ वजनाचा गांजा हा अमली पदार्थ आढळला.

संशयित अत्ताउल्ला सलिम पटेल, फहाद मुस्ताक पाटणकर आणि आयान अजिज मुल्ला या तिघांनाही लगेच ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ कायद्यान्वये रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांकडून ३५३ ग्रॅम गांजा व दुचाकी (क्र. एमएच-०८-एटी-६७९२) आणि (एमएच-०८-एव्ही-४६३०) तसेच चार मोबाईल असा एकूण २ लाख २३ हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक आणि व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ढेरे आणि व पोऊनि श्री. शिंदे, पोऊनि श्री. पवार, पोहवा शांताराम झारे, पोहवा नितीन डोमणे, पोहवा विजय आंबेकर, पोहवा अमित कदम, पोहवा विवेक रसाळ, पोहवा योगेश नार्वेकर, पोहवा योगेश शेट्ये, पोहवा भैरवनाथ सवाईराम, पोहवा सत्यजित दरेकर, महिला पोलिस हवालदार वैष्णवी यादव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button