
महायुती सरकारने घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नसल्याची घोषणा करूनही महावितरण कडून मीटर लावण्याची सक्ती सुरू.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु, आता महावितरणकडून या मीटरचे नाव टीओडी (टाईम ऑफ डे) असे बदलवून सर्व ग्राहकांकडे सक्तीने लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत.महावितरणने राज्यातील २.४१ कोटी ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विविध खासगी कंपन्यांना कंत्राट दिले होते. परंतु, राज्यभरातील ग्राहक संघटना, कामगार संघटनांसह नागरिकांकडून विरोध वाढल्यावर तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मीटर घरगुती ग्राहकांकडे लावणार नसल्याची घोषणा केली होती. आता मुख्यमंत्री व ऊर्जामंत्रीपदी फडणवीस आहेत. तरीही हे मीटर लावले जात आहेत.