
महर्षी कर्वे महिला महाविद्यालय तर्फे महाविद्यालयीन प्राचार्यांसाठी AI Tools कार्यशाळा संपन्न.
महर्षी कर्वे महिला महाविद्यालय तर्फे महाविद्यालयीन प्राचार्यांसाठी AI Tools कार्यशाळा नुकतीच संपन्न झालीकार्यक्रमाचा सुरवातीला उपस्थतीती सर्वांनी १ मिनिटे स्थब्ध उभे राहून काश्मीर येथे पहलगाम मध्ये दहशतवादी हल्यामध्ये मृत पावलेल्या आपल्या देश बांधवांसाठी श्रध्दांजली अर्पित केले. महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन प्राचार्यांसाठी AI Tools या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी हॉटेल विवा एक्झिक्यूटिव्ह, मारुती मंदिर येथे करण्यात आले. या कार्यशाळेत विविध हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सहभागी झाले होते.
उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत उस्फुर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात आश्रमगीत, दिपप्रज्वलन व भारतरत्न महर्षी कर्वे व बाया कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून AI व मशीन लर्निंग या क्षेत्रात 25 वर्ष कार्यरत असणारे AI तज्ञ डॉ. आशिष तेंडुलकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. आशिष तेंडुलकर हे गुगल इंडिया मध्ये AI & ML Leader म्हणून कार्यरत आहे. शैक्षणिक प्रशासन, अध्यापन व नियोजन या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या उपयोगाबाबत त्यांनी सविस्तर माहिती आपल्या ओघवत्या शैलीत दिली.
ChatGPT,Gemini, Notebook Lm, पॉवर पॉइंटचा वापर करुन प्रेंझेटेशन कसे करावे, Excel sheet कशी तयार करावी याचे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचे मुख्य उद्देश AI बद्दल जागरुकता निर्माण करणे. शाळेच्या प्रशासनात व अध्यापन प्रक्रियेत AI चा सकारात्मक वापर कसा करता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे मुल्यांकन ,अहवाल लेखन या कामामध्ये AI Tools चा वापर करुन कार्यक्षमता कशी वाढवू शकतो आणि भविष्यातील जे शैक्षणिक बदल होत आहेत त्या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी मुख्याध्यापकांना पुढाकार घेऊन इतर शिक्षकांना मार्गदर्शन करणे .या प्रशिक्षणासाठी गोगटे जोगळेकर कॉलेजच्या गणित विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे , जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रत्नागिरी सीनियर लेक्चरर क्लास वन ऑफिसर अनुपमा तावशीकर , महर्षी कर्वे संस्थेचे प्रकल्प प्रमुख श्री मंदार सावंतदेसाई, प्रकल्प समन्वयक श्री स्वप्निल सावंत, महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या स्नेहा कोतवडेकर उपस्थित होत्या.
DITE च्या अनुपमा तावशीकर यांनी आजच्या या युगात AI मध्ये वाढत जाणाऱ्या प्रभावाबरोबर आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनात AI चा एक सपोर्ट सिस्टीम म्हणून वापर केला पाहिजे असे सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजीव सत्रे यांनी शिक्षणासाठी वयाची मर्यादा नसावी , आपण सतत शिक्षण घेत राहिले पाहिजे आणि आपल्या कक्षा रुंधावल्या पाहिजेत. प्रशिक्षणार्थी यांना शुभेच्छा देत प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिस्टंट प्रोफेसर केतन पाथरे यांनी केले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन असिस्टंट प्रोफेसर श्रुती यादव यांनी केले .तसेच या कार्यक्रमाची सांगता बीसीए महाविद्यालयाच्या कु.वेदश्री सरदेसाई हिने सादर केलेल्या पसायदानाने झाली.