
समुद्र खेळाचा आनंद घेत असता गणपतीपुळे समुद्रात कोल्हापुर येथील एकाचा बुडून मृत्यू
पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी कोल्हापूर येथून गणपतीपुळे येथे आलेल्या सुरेश जेटानंद गावराणी (वय 49) या कोल्हापूर येथील प्रौढाचा समुद्र खेळाचा आनंद घेत असताना तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना काल घडली
कोल्हापूर येथील गावरानी कुटुंब गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते गणपतीपुळे समुद्रात समुद्री सहाशे खेळाचा आनंद घेत असताना प्रौढाचा ड्रॅगन बोटीवरून पडून मृत्यू झाला.ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान गणपतीपुळे समुद्रात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ताराबाई पार्क, कापसे जिल्हा कोल्हापूर या ठिकाणाहून सुरेश जेटानंद गावराणी व त्यांचे कुटुंबीय गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आले होते. त्या दरम्यान ते आपल्या फॅमिलीसह सायंकाळी गणपतीपुळे समुद्रात ड्रॅगन बोटीचा आनंद घेण्यासाठी ते समुद्रात गेले असता ड्रॅगन वरून हात सटल्याने ते खाली समुद्रात पडले.यावेळी समुद्रातील मोठ्या लाटेमुळे ते पाण्यात बुडू लागले. या ड्रॅगन बोटीवर त्यांनी सुरक्षिततेसाठी जॅकेट घातले होते. परंतु तरीसुद्धा ते पाण्यात बुडू लागल्याचे निदर्शनास येताच तात्काळ स्थानिक बोट व्यवसायिक आणि समुद्रा बाहेर असलेल्या जीव रक्षकांनी त्यांना तात्काळ पाण्याबाहेर काढले.
त्यानंतर गणपतीपुळे देवस्थानच्या ॲम्बुलन्सने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे आणण्यात आले. यावेळी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले.