
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे टेम्पोतील लोखंडी बार थेट एसटीत घुसल्याने अपघात.
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे टेम्पोतून वाहतूक करण्यात येत असलेला लोखंडी बार एसटी बसच्या मागील बाजूने आत घुसल्याने अपघात झाला. सुदैवाने वनबसच्या मागील सीटवर प्रवासी नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता होती. अशा प्रकारे लोखंडी साहित्याची वाहतूक करणार्यांवर पोलिसांकडून कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
माहितीनुसार जयगड – रत्नांगिरी एसटी बस ही २३ रोजी सकाळी कुवारबाव मार्गे रत्नागिरीच्या दिशेने येत होती. याचवेळी लोखंडी बारची वाहतूक करणारा टेम्पो एसटी बसच्या मागून येत होता. लोखंडी बार टेम्पोच्या आकारापेक्षा मोठा असल्याने तो गाडीच्या बाहेर आला होता. कुवारबाव येथे टेम्पो चालकाला अंदाज न आल्याने लोखंडी बार एसटी बसच्या मागील बाजूने आत घुसला. सुदैवाने प्रवासी नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही.www.konkantoday.com